Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेंदुर्णीत महाआरोग्य व कोविड लसीकरण शिबिर उत्साहात

शेंदुर्णी प्रतिनिधी । येथील माहेश्वरी मंगल कार्यालयात नुकतेच महाआरोग्य व कोविड लसीकरण शिबिर राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल, जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तसेच पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.सागर गरूड यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले होते.

महाआरोग्य शिबिराची सुरुवात दीप प्रज्वलन व भगवान धन्वंतरी प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य व जिल्हा नियोजन मंडळ सदस्य संजय गरुड तर प्रमुख उपस्थितांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक नाना पाटील, ज्येष्ठ नेते दगडू पाटील, डीगंबर पाटील, भास्कर पाटील, भगवान पाटील,आबासाहेब पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, युवक अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील, कार्याध्यक्ष दत्ता साबळे, श्याम साळवे, शैलेश पाटील, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर भूषण मगर, पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे तसेच तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नगरसेवक,नगरसेविका व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

या आरोग्य शिबिरांत १७५० रुग्णांच्या विविध आजाराच्या तपासण्या केल्या तर ११५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले व ४० मोतीबिंदू रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे गोदावरी मेडिकल कॉलेज जळगाव येथे ४० रुग्णावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

आजच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ३ हजार उर्दू कॅलेंडरचे लोकार्पण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टरसेल तर्फे  जिल्हाभरात जनताभिमुख उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे डॉ सागर गरूड सांगितले.

 

Exit mobile version