Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाल ग्रामीण रुग्णालयात बिन टाका शस्त्रक्रिया शिबीर उत्साहात

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात ग्रामीण रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ एन एस चव्हाण यांच्या पुढाकाराने आदिवासी  भागातील कुटुंब नियोजन करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांसाठी पाल ग्रामीण रुग्णालय याठिकाणी बिन टाका शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात २९ महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली यासाठी पाल ग्रारुचे वै अ बी बी बारेला,  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ शिवराय पाटील, डॉ सचिन पाटील  डॉ विजया झोपे(खिरोदा ),  डॉ  नीरज पाटील (लोहारा ), डॉ   चंदन पाटील (निंभोरा ), डॉ  मोरे (थोरगव्हाण ) अनुपम अंजलसोंडे (वाघोड), डॉ  योगेश उंबरकर (लोहारा ), यांच्यासह समन्वयक रामभाऊ पाटील, महेमूद तडवी यांच्यासह सर्व परिचारिका, कक्षसेवक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले 

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चव्हाण यांनी पाल ग्रामीण  रुग्णालयाला एक आयडियल रुग्णालय सर्वांनी मिळून बनवू या असे आवाहन करीत अधिकाधिक सुविधा उपलब्ध करवून देवू असेही नागरिक व पत्रकार यांच्याशी बोलतांना सांगितले यावेळी जळगाव येथील पवन जैन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते

Exit mobile version