Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महावीर शाळेत आनंद मेळावा उत्साहात

पहूर. ता.जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज । येथील महावीर पब्लिक इंग्लिश मीडियम शाळेत आनंद मेळावाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

आनंद मेळाव्याचे उद्घाटन महावीर पब्लिक स्कूलचे चेअरमन तथा माजी जि. प. कृषी सभापती प्रदीप लोढा व शाळेचे संचालक सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना दैनंदिन जीवनात व्यवहारिक ज्ञान तसेच पैशांची देवाणघेवाण कशाप्रकारे करावी या उदात्त हेतूने शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपापल्या घरून विविध पदार्थ तयार करून या आनंद मेळाव्याच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले होते. विद्यार्थ्यांनी लावलेल्या दुकानांवर विविध साहित्याचे दुकानावर अनेकांनी खाद्यपदार्थांची खरेदी केली व विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला. आनंद मेळावा उत्साहात पार पडला आनंद मेळावा यशस्वितेसाठी  उपमुख्याध्यापिका क॔डारे, आसिफ पिंजारी, चव्हाण, नेमाडे, हटकर, लाड, वैद्यकर, माहोरे, तायडे, किरण भट तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी अथक परिश्रम घेतले.

 

Exit mobile version