Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हरिविठ्ठल नगरात एकाने घेतला गळफास

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या ४८ प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी ११ जून रोजी दुपारी १२ वाजता उघडकीला आली आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

गणेश आत्‍माराम बडगुजर (वय-४८) रा. धनगरवाडा, हरीविठ्ठल नगर जळगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश बडगुजर हा आई व पत्नी प्रतिभा यांच्यासह वास्तव्याला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पत्नी सोबत गणेशचे कौटुंबिक वाद सुरू होते. त्यामुळे त्यांची पत्नी गेल्या दोन महिन्यांपासून जळगावात राहणारी मोठी मुलगी यांच्याकडे राहण्यासाठी गेली होती. दरम्यान शनिवारी ११ जून रोजी सकाळी ९ वाजता मोठ्या मुलीसोबत पत्नी प्रतिभा ह्या घरी आलेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या घरी त्यांची कुसुंबा येथे राहणारी ननंद घरी आल्या होत्या. पुन्हा पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरू झाला, त्यामुळे त्यांची पत्नी प्रतिभा या मोठ्या मुलीसह पुन्हा घरातून निघून गेल्या. त्यानंतर गणेश यांची बहिणीला सोडण्यासाठी त्यांची आई हरीविठ्ठल रिक्षा स्टॉप वर गेले असता याच वेळात ते घरी एकटे होते त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यांची आई घरी आल्यावर मुलाने गळफास घेतल्याचे उघडकीला आले, मुलाचा मृतदेह पाहून आईने मोठा आक्रोश केला होता. याबाबत रामानंदनगर पोलिसांना कळविण्यात आले, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी आणि तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत गणेश यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

 

Exit mobile version