Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर १८ गुन्हेगारांना जणांना हद्दपारीचे आदेश !

जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांताधिकारी यांच्या सुचना

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या १८ गुन्हेगारांना शहरातून हद्दपारीचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी महेश सुधळकर यांनी गुरुवार ८ सप्टेंबर रोजी दुपारी काढले आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्याला कारवाईच्या सूचना देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरात गणेशोत्सव मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात गणेश विसर्जन मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही तसेच गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत शांतता राहावी यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या १८ गुन्हेगारांना शहरबंदी लागू करण्यात आली असून हद्दपारीचे आदेश काढण्यात आले आहे. यात टिनू उर्फ अरुण शिवराम गोसावी रा. कासमवाडी, अफजल खान रशीद खान फावड्या रा. तांबापुरा, उदय रमेश मोची रा. रामेश्वर कॉलनी, आकाश अरुण दहेकर रा. कंजरवाडा, विशाल राजू अहिरे रा. मेक्सोमाता नगर, शेख रफत शेख सलीम रा. कंजरवाडा, बिजासन फकीरा घुगे रा. मेहरून, सनी उर्फ फौजी बालकृष्ण जाधव रा. रामेश्वर कॉलनी, मायकल उर्फ रमेश कन्हैया नेतलेकर रा. कंजरवाडा, आकाश उर्फ खड्या सुकलाल ठाकूर रा. कासमवाडी, रवींद्र राजू हटकर रा. गवळीवाडा, तांबापूर, खुशाल उर्फ काल्या बाळू मराठे रा. रामेश्वर कॉलनी, योगेश उर्फ चपट्या राजेंद्र चौधरी रा. रामेश्वर कॉलनी, विशाल मुरलीधर दाभाडे रा. रामेश्वर कॉलनी, जुबेर यासीन खाटीक रा. तांबापुर, जळगाव, सुनील रसाल राठोड रा. कासमवाडी, ललित उमाकांत दीक्षित रा. कासमवाडी आणि संतोष उर्फ बब्या पाटील रा. कुसुंबा ता.जि. जळगाव या १८ जणांना शहरात बंदी केली आहे. याबाबत कारवाई करण्याच्या सूचना एमआयडीसी पोलिसांना देण्यात आला आहे.

Exit mobile version