Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबाद येथे जुन्यावादातून तरूणाला काठीसह दगडाने मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथे  येथे जुन्या वादातून तरूणाला दोन जणांनी काठीसह दगडाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवार ९ फेब्रुवारी रोजी दोन जणांविरूध्द नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

 

याबाबत माहिती अशी की, शेख समीर शेख तालीब हा मदिना चौक नशिराबाद येथे राहतो. मंगळवार ८ फेब्रुवारी रोजी घराजवळ कार्यक्रम असल्याने शेख सभेत हा त्या ठिकाणी गेला होता या ठिकाणी काही लोकांचं वाद सुरू होता. वाद पाहण्यासाठी समीर उभा राहिला. या वाद सुरु असतांना काही लोकांना समीर हा दुसर्‍या गटाकडून असल्याचा गैरसमज झाल्याने त्यातून २ जणांनी शेख समीर यास काठीने तसेच दगडाने मारहाण केली. डोक्यात दगड लागल्याने त्यामुळे दुखापत झाली असून समीर जखमी झाला आहे. याप्रकरणी शेख समीर याने दिलेल्या तक्रारीवरून यासीन शाह नूरशाहा व रहिम शाह खलील शाहा या दोघांविरूध्द नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल गजानन देशमुख हे करीत आहेत.

Exit mobile version