Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगरात बंद घर फोडून ५१ हजारांचा ऐवज लांबविला

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी 51 हजारांचा ऐवज लांबवला. ही घरफोडी शहरातील शिव कॉलनीत १० ते १३ डिसेंबर दरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कैलास राजाराम दाणी (वय-६४ , रा.  मुक्ताईनगर) हे तापी पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी असून कुटूंबासह शिव कॉलनीत वास्तव्यास आहेत. दाणी कुटूंब १० ते १३ दरम्यान जळगाव येथे गेल्यानंतर घर बंद होते व ही संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी १० हजार रुपये किंमतीची चांदीची नाणे, २९ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे, १२ हजारांची रोकड असा एकूण ५१ हजारांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करीत आहेत.

Exit mobile version