Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मारूळ गावात सिंगल फेज ऐवजी दोन फेजमध्ये विद्यूत पुरवठा करा

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील मारूळ येथे होणारा वीजपुरवठा हा सिंगल फेज ऐवजी दोन पेजमध्ये करावा या मागणीचे निवेदन मारवड ग्रामपंचायतीच्या वतीने महावितरण कार्यालयाला देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल तालुक्यातील मारुळ गावात महावितरणच्या वतीने सिंगल फेज योजना राबविण्यात आले आहे. थ्री-फेज विद्युत पुरवठा कालावधी संपला की, गावात सिंगल फेज विद्युतपुरवठा सुरू होतो. परंतु सदरच्या विद्युत पुरवठा हा एक फेज स्वरूपाचा असल्याने नागरिकांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुढील महिन्यात मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू होत आहे. त्यामुळे रमजान महिना भर उन्हाळ्यामध्ये सुरू होत असून लहान बालकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत त्यांचे कडक उपवास असतात त्यातच उन्हाचे तापमान जास्त असल्यामुळे उपवास असलेल्या सर्वांनाच थंडाव्यासाठी विद्युत उपकरणाचा वापर करावा लागतो. परंतु सिंगल फेज असल्याकारणामुळे विद्यूत पुरवठा संथ गतीने होत असतो. यामुळे नागरीकांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे महावितरण विभागाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन सिंगल फेज ऐवजी दोन फेजमध्ये विद्युतपुरवठा करावा, या मागणीचे निवेदन मारुळ ग्रामपंचायतीचे सरपंच सैय्यद असद अहमद जावेद अहमद यांनी सावदा येथील महावितरण विभागाला दिले.  याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी बी.के. पारधी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Exit mobile version