Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मारूळ येथे अवैद्य धंद्यांमुळे अनेकांचे कुटुंब उद्धवस्त; अवैध धंदे बंद करण्याची महिलांची मागणी

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मारूळ या गावात रमजानचे पवित्र सण असतांना देखील मोठ्या मोठ्या प्रमाणावर अवैद्यधंदे सुरू असुन सर्वत्र सट्टामटका घेतला जात असून, गावात गावटी दारूची विक्री खुलेआम विक्री करण्यात येत असून हे धंदे पोलीस प्रशासनाने तात्काळ बंद करावी अशी मागणी, फैजपुरचे सपोनि निलेश वाघ यांच्याकडे मारूळ गावातील महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे.

मावळ तालुका यावल येथे मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गावात सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सट्टा मटका घेतला जात असून त्याच बरोबर अवैध गावठी दारू देखील सर्रासपणे विकली जात आहे. सद्या मुस्लीम बांधवांचे पवित्र रमजान महीना सुरू असुन समाज बांधवांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, असे असतांना देखील अवैद्य धंदेवाले हे कुणाला ही न जुमानता खुल्लेआम गावात ठीकठिकाणी पानटपऱ्यांवर सट्टा मटका व गावटी दारू विक्री ही मोठया प्रमाणावर केली जात आहे. दरम्यान या बिनधास्तपणे विक्री होणाऱ्या दारूमुळे व्यसनाधिन झालेले अनेकांचा दुदैवी मृत्यु झाला. त्यांच्या उपासमारीची वेळ येवुन त्यांचे कुटूंबांचे जिवन उद्धवस्त झाले आहे.

तरी पोलीस प्रशासना तात्काळ दखल घेत ही सर्व प्रकारची अवैद्यधंदे बंद करावीत अशा मागणीचे निवेदन सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघ यांना देण्यात आले. या निवेदनावर लता सिताराम तायडे, पिंकी मिलन तायडे, शारदा र्ईश्वर तायडे , पुष्पाबाई तायडे, मराबाई शिमरे, बेबाबाई गावडे, रजुबाई कोळी, उषाबाई कोळी, मंजुलाबाई शिमरे, संगीताबाई कोळी यांच्यासह रिपाई आठवले गटाच्या अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष राजु रमजान तडवी, संजय तायडे व हिरामण पाटील यांच्या स्वाक्षरी आहेत

Exit mobile version