Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्रात रुग्ण संख्येने ओलांडला १३ लाखांचा टप्पा

मुंबई –  महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या १३ लाख ७५७ इतकी झाली असून मागील २४ तासांमध्ये १९ हजार ५९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आज राज्यात १७ हजार ७९४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये करोनाची बाधा होऊन ४१६ मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र्रातील एकूण रुग्णसंख्येने १३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची एकूण संख्या १३ लाख ७५७ इतकी झाली आहे. महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये १९ हजार ५९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजवर महाराष्ट्रात ९ लाख ९२ हजार ८०६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७६.३३ टक्के इतका झाला आहे.

आजवर तपासण्यात आलेल्या ६२ लाख ८० हजार ७८८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३ लाख ७५७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९ लाख २९ हजार ५७२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३२ हजार ७४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्याच्या घडीला २ लाख ७२ हजार ७७५ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

मागील २४ तासांमध्ये ४१६ मृत्यूंची नोंद झाली आहे. ज्यापैकी २२८ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १०६ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित ८२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालवाधीपूर्वीचे आहेत. अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Exit mobile version