Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्रात एकूण ११ लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई- राज्यात गत २४ तासांमध्ये १६ हजार १०४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आजवर एकूण ११ लाख ४ हजार ४२६ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रातील रिकव्हरी रेट हा ७८.८४ टक्के इतका झाला आहे. 

राज्यात  मागील चोवीस तासांमध्ये १६ हजार ४७६ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर चोवीस तासांमध्ये ३९४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आजवर तपासण्यात आलेल्या ६८ लाख ७५ हजार ४५१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४ लाख ९२२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात २१ लाख ७४ हजार ६५१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर २८ हजार ७२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. सध्याच्या घडीला राज्यात २ लाख ५९ हजार अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

आज महाराष्ट्रात १६ हजार ४७६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या १४ लाख ९२२ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या ३९४ मृत्यूंपैकी २२९ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १०३ मृत्यू हे गत  आठवड्यातले आहेत. तर उर्वरित ६२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीतले आहेत. अशीही माहितीही महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Exit mobile version