Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात युवक काँग्रेसचे पकोळे तळून निषेध आंदोलन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । इच्छादेवी चौकात जळगाव शहर व जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने रविवारी १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस पकोडे तळून राष्ट्रीय बेरोजगारी दिवस साजरा करून अनोखे आंदोलन केल्याचे पहायला मिळाले. हे आंदोलन युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.

२०१४च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांना दरवर्षी २ करोड नोकऱ्या देण्याचे खोटं आश्वासन दिले. आज मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत्या होत आहेत. परंतु अद्याप देशातील कुठल्याही युवकाला मोदी सरकार रोजगार देऊ शकले नाही. याचा निषेधार्थ युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास  यांच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र राज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये रविवारी १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता युवक काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करण्यात आला. जळगाव शहरातील इच्छादेव चौकात देखील जळगाव शहर व ग्रामीण युवक काँग्रेसच्या वतीने पकोड तळून बेरोजगार दिवस साजरा करण्यात आला.

पदवीधर युवकांना बेरोजगार करण्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाचा  निषेध व्यक्त करण्यात आला.  याप्रसंगी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, शहराध्यक्ष मुजीब पटेल, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष जाकिर बागवान, तेनु सोनार,  आशिष पाटील,  नयन कोळी,  निलेश पाटील, वसीम बापू, जमील शेख, टिपू बागवान, इसा व्यापारी, विजय चौधरी,  राजू पाटील,  भगवान सिंग पाटील,  लोकमान शेख, ईबा बागवान यांच्यासह आदी उपस्थित होते.

Exit mobile version