Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात जागेच्या वादातून दोन महिलांचा विनयभंग

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील एका भागात जागेच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी करून दोन्ही कुटुंबातील दोन महिलांचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पविरोधात तीन जणांवर विनयभंग केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जळगाव शहरातील एका भागात दोन कुटुंबिय एकाच भागात राहतात. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जागेच्या वादातून दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे. दोन कुटुंबियांमध्ये झालेल्या वादात दोन महिलांचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. एकामेकांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोन्ही कुटुंबियांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बुधवार १६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता धाव घेवून एकमेकांविरूध्द तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून परस्पर विरोधात तीन जणांविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हरीलाल पाटील करीत आहे.

 

 

 

Exit mobile version