Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर येथे महाजन तंत्रनिकेतनमध्ये सेवानिवृत्तीनिमित्ताने सत्कार

WhatsApp Image 2019 12 04 at 11.01.07 AM

फैजपूर, प्रतिनिधी | येथील जे. टी. महाजन तंत्रनिकेतनमध्ये प्राचार्य पी. बी. पाटील, निर्देशक सी. आर. सरोदे, शिपाई के. एन. महाजन यांचा दि ३० नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्ती आणि सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी सत्कार्थिनी मनोगत व्यक्त करतांना संस्थेबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

तंत्र व वैद्यक शिक्षक मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन, उपाध्यक्ष उल्हास निंबा चौधरी, तथा मार्तंड गणपत भिरुड, सचिव विजय कुमार झोपे, संचालक विष्णू विठू बोरोले, प्रभाकर भोजू सरोदे, शशिकांत रामचंद्र चौधरी, विजयसिंग परदेशी, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नंदिनी चौधरी, इंग्लिश मेडीयम स्कूलचे प्राचार्य मोझेस जाधव, आय. टी. आय.चे प्राचार्य प्रविण फालक यांच्या उपस्थितीत निरोपार्थींचा सत्कार करण्यात आला. याभावनिक प्रसंगी व्ही. बी. लोंढे, एस. जी. गुळवे, पी. एम. गावंडे, एस. टी. इंगळे तसेच तंत्रनिकेतनचे प्र.प्राचार्य एस. एस. झोपे, संस्थेचे उपाध्यक्ष उल्हास चौधरी, संचालक प्रभाकर भोजू सरोदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांनी पी. बी. पाटील यांनी आपल्या काळात संस्थेच्या भरभराटीसाठी केलेल्या कार्यांना उजाळा देत अनेक प्रसंगांचा उल्लेख केला. तसेच संस्थाध्यक्ष शरद महाजन यांनीही पी. बी. पाटील यांनी सुरूवातीपासून त्यांनी केलेल्या विविध कामांचे कौतुक करून त्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सेवानिवृत्त झालेले पी. बी. पाटील, सी. आर. सरोदे, के. एन. महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन एस. सी. सैतवाल यांनी तर आभार एम. बी. जोगी यांनी मानले.

Exit mobile version