Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चितोडा शिवारात अज्ञातांनी उभा हरभरा पेटविला; ४७ हजाराचे नुकसान

यावल  – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील चितोडा येथील शेतकऱ्याच्या शेतातील शेतातील हरभऱ्याला अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये ४७ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर झाले आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश रमेश कुरकुरे (वय-४०) रा. चितोडा ता. यावल यांनी चितोडा विठ्ठल मंदिराच्या ट्रस्टच्या मालकीचे शेत बटाईच्या माध्यमातून केलेले आहे. यंदा त्यांनी त्यांच्या शेतामध्ये हरभराची लागवड केली होती. दोन दिवसांत नंतर हरभरा काढण्याच्या तयारीत असताना अज्ञात व्यक्तीने रविवारी १३ मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अंदाजे १० क्विंटल असलेला हरभरा पेटवून दिला आहे. यामध्ये जवळपास ४७ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. याबाबत शेतकरी दिनेश कुरकुरे यांनी यावल पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर परदेशी करत आहे.

Exit mobile version