Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात तरूणाने घेतला गळफास

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील जहागीरदार वाडी येथील २७ वर्षाच्या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजता उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

सविस्तर माहिती अशी की, रमजान बेग इसुफ बेग (वय-२७) रा. जहागीरदार वाडी चाळीसगाव याने तरूणाने राहत्या घरात कुणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले. त्याचे नातेवाईक इम्रान बेग हुसेन बेग याने खाली उतरवून तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Exit mobile version