Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात एकावर चॉपरने गंभीर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील कादरी नगरात सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास तिघांनी जबर मारहाण केल्याने एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमीवर देवरे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

 

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मोहत्तीसीम सय्यद यास किरकोळ कारणातून शेख शोएब शेख कादर उर्फ डिब्बर व त्याच्यासोबत असलेले त्याचे दोन मामा यांनी चॉपरने पोटावर व मांडीवर गंभीर वार करून जखमी केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. येथील देवरे रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून येथील पोलिस स्थानकात त्याने दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी दुपारी भादवि कलम ३०७,३२३ व ३४ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश घोळवे करीत आहेत.

Exit mobile version