Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भुसावळात रानमळा पॅटर्नप्रमाणे स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण एक दिशादर्शक उपक्रम

भुसावळ प्रतिनिधी । आज, जैन श्रवक संघाचे कार्याध्यक्ष गौतम चोरडिया व घराण्याचे आधारस्तंभ स्वर्गीय इंद्रचद चोरडिया यांच्या ६व्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने नुकताच रानमाळा पॅटर्नवर आधारित जीआर जारी करत स्मृतिदिनानिमित्त “वृक्षारोपण एक दिशादर्शक उपक्रम” राबविण्याच्या सुचविले आहे. 

यानुसार चोरडिया परिवाराने १९ रोजी स्व. इंदरचद चोरडिया यांच्या स्मृती दिनानिमित्त 21 झाडे ट्री गार्डसह लावण्याचा संकल्प करून  11 झाडे ट्री गार्डसह श्रद्धा नगर आणि परिसरात लावली उर्वरित दहा झाडे पुढील रविवारी ट्री गार्ड सह कोळी मंगल कार्यालयाजवळ लावण्यात येणार आहेत.

. स्व. इंदरचंद चोरडिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना ही त्यांनी फळांची झाडे भेट दिली या लावलेला झाडांचे संवर्धन व संगोपन करण्याची जबाबदारी अहिल्यादेवी चे शिक्षक  अजय डोळे सर यांनी स्वीकारली. पुढील वर्षी लावलेल्या झाडांचे संगोपन संवर्धन केलेल्या व्यक्तींचे सत्कार करण्याचे सुतोवाच चोरडिया परिवाराने व निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी याप्रसंगी केले.  यावेळी निसर्ग पर्यावरण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील सर यांनी शासनाच्या   रानमळा पॅटर्न च्या जीआर प्रमाणे आपण स्मृतिदिनानिमित्त झाडं लावली हा एक अतिशय चांगला समाजाला दिशा देणारा उपक्रम ठरेल .आपण प्रत्येकाने अनेक चांगल्या शुभ प्रसंगी झाडे लावून जतन करावी संगोपन करावी तरच भविष्यात आपण आपण निसर्गाच्या संगतीने निरोगी राहू असे मत  व्यक्त केले.

यावेळी रोप लावण्यापूर्वी गौतम चोरडिया व नाना पाटील यांच्या हस्ते वृक्ष रोपांचे हस्ते  पूजन करण्यात आले.

या प्रसंगी रिदम हॉस्पिटलचे संचालक डॉ. लक्ष्मीकांतजी नागला, सामाजिक कार्यकर्ते जे बी कोटेचा,  रघुनाथ सोनवणे, मुन्ना ठाकूर, कांतीलाल चोरडिया, सुरेंद्र सिंग पाटील , विजय चोरडिया ,जे.पी चोरडिया, विशाल चोरडिया, गितेश चोरडिया व परिसरातील नागरिक उपस्थित होते. अजय डोळे सर आणि राज्य सल्लागार सुरेंद्रसिंग पाटील यांनी सहकार्य केले शेवटी गौतम चोरडिया यांनी व कांतीलाल चोरडिया यांनी आभार मानले.

 

Exit mobile version