Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भागवत कथेत श्रीकृष्ण जन्मोत्सवात… आमदारांनीही धरला भजनावर ताल

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आ.अनिल भाईदास पाटील यांच्या परिवाराने हिंगोणे खु.प्र ज येथे आपल्या गावी भागवत कथा आयोजित केली असून यादरम्यान श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळ्यासाठी आ. पाटलांनी आवर्जून उपस्थिती देत  असंख्य भाविकांसह त्यांनी  भजनावर ताल धरल्याने या सोहळ्यात विशेष रंगत आली.

 

अमळनेर तालुक्यातील हिंगोणे खु.प्र ज  येथे आ. अनिल भाईदास पाटील, भदाणे परिवार व ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने श्रीमद् भागवत कथा आयोजित करण्यात आली  आहे.  यास दररोज पंचक्रोशीतील भाविकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे. प्रा. सुशीलजी महाराज विटनेरकर यांच्या अमृतवणीतून ही कथा होत आहे.  पाचव्या दिवशी श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आमदार स्वतः परिवारासह उपस्थित राहिले. कथेचे प्रवक्ते महंत प्रा.सुशीलजी महाराज विटनेरकर यांनी भगवंताच्या भक्तांचे चरित्र सांगत श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासिका तिलोत्तमा पाटील, जि.प सदस्या जयश्री अनिल पाटील, हिंगोणे खु.प्र.ज सरपंच  राजश्री पाटील यांच्या सह ग्रामस्थ मंडळ, समस्त पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीकृष्ण जन्मोत्सव झाल्यानंतर भगवंताच्या भजनावर सगळ्यांनी पावली खेळत आनंद साजरा केला.

दरम्यान भागवत कथेच्या माध्यमाने हिंगोणे खु.प्र ज गावामध्ये जणू वृंदावन च अवतीर्ण झाल्याचा आनंद तिलोत्तमा पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केला. तर सद्गुरू संत तानाजी महाराज परंपरेचे वंशज असणारे महंत प्रा.सुशीलजी महाराज हे आमच्या गावाला वक्ता म्हणून लाभले हे आमचे भाग्य असून महाराजांनी संपूर्ण गावांमध्ये भक्तिमय वातावरण केल्याचा आनंद गौरोद्गर  आ. अनिल भाईदास पाटील यांनी काढले.

Exit mobile version