Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भडगावात व्यापारी असोसिएशनने स्वयंफुर्तीने ठेवला बंद

 भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोंडगाव येथील चिमकलीच्या हत्येच्या निषेधासाठी आज तालुका आणि शहर व्यापारी असोसिएशनने स्वयंस्फुर्तीने बंद पाळला आहे.

भडगाव तालुक्यातील गोंडगाव या गावी आठ वर्षे चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करून कुट्टीच्या ढिगाराखाली दाबून निर्दयीपणे हत्या करणार्‍या नराधमास कठोरात कठोर कारवाई करून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालून या खटल्यासाठी उज्वल निकम यांचे नियुक्ती करून आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी यासाठी आज बंद पाळण्यात आला.

 

भडगाव शहर तसेच तालुक्यातून सर्व व्यापारी, मेडीकल असोसिएशन, किराणा असोसिएश,  हातमजूर, हॉटेल असोसिएशन, सलून असोसिएशन, पान टपरी व्यावसायिक, सोनार असोसिएशन, आटोमोबाईल असोसिएशन, इलेक्ट्रॉनिक व हार्डवेअर असोशियन, कापड असोशियन, फोटोग्राफर असोशियन व सर्व ग्राहक सेवा संघ अश्या सर्व व्यापारी तसेच दुकानदार युनियन यांनी स्वयंपूर्णतेने आपापले व्यवसाय तसेच दुकाने बंद ठेवून या निंदनीय घटनेचा जाहीर निषेध केला.

 

दरम्यान, या अनुषंगाने भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांना प्रमुख मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी व्यापारी संघटना पदाधिकारी व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Exit mobile version