Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात बस गेली खड्ड्यात; तीन विद्यार्थी जखमी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  रस्त्याच्या मध्यभागी दुचाकी उभी करून दारूच्या नशेत झोपलेल्या व्यक्तीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस खड्ड्यात गेल्याची घटना घडली आहे. यात तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहे.

गुरूवारी २१ सप्टेंबर रोजी  यावल एसटी आगारातील बस क्रमांक (एमएच २० डी ९९७५) ही सकाळच्या सुमारास वड्री कडून प्रवाशी घेवून यावलच्या दिशेने येत असतांना यावल शहरापासुन सुमारे १ किलो मिटर लांब असलेल्या ठिकाणी एक दारूच्या नशेतचिंब असलेला दारूडा व्यक्ती आपली दुचाकी लावून रस्त्यावर झोपलेला होता. वाहनचालक यांनी त्यास वाचविण्यासाठी एसटी बस रस्त्याच्याकडेला जात असतांना रोडच्या खाली उतरवून खड्ड्यात गेल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिन विद्यार्थीनी जखमी झाले आहे. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  दरम्यान घटना घडल्यानंतर त्या दारूड्याने वाहनचालकाशी हुज्जत घालून पळ काढला आहे.

या अपघाताची माहीती मिळताच यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी तात्काळ जख्मी रूग्णाची काळजी घेत त्यांना त्वरित उपचारासाठी शासकीय मदत केली. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अपघाताची  नोंद दाखल करण्यात आली आहे . यावल तालुक्यात खुलेआम हातभट्टीची गावटी दारू व पन्नी दारूची सर्वत्र विक्री होत असल्याचा हा परिणाम असल्याची संतप्त प्रतिक्रीया जख्मी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केल्या असुन , एसटी चालकाने प्रसंगी दक्षता घेतली नसती तर मोठा अपघात झाला असता असे देखील अपघातास्थळी उपस्थित नागरीकांमध्ये बोलले जात आहे .

Exit mobile version