Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

देशात २४ तासांत ९२ हजार नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले

 

दिल्ली वृत्तसेवा । भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून मागील २४ तासांत देशात ९२ हजार ७१ नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच एक हजार १३६ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि गुजरातसारख्या राज्यात करोनाचा सर्वाधिक जास्त प्रभाव आहे.

भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. मागील २४ तासांत देशात ९२ हजार ७१ नवीन रुग्ण आढळले तर एक हजार १३६ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, दिल्ली आणि गुजरातसारख्या राज्यात करोनाचा सर्वाधिक जास्त प्रभाव आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दहा लाखांच्या पुढे गेली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४८ लाख ४६ हजार ४२८ इतकी झाली आहे. यामध्ये ९ लाख ८६ हजार ५९८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ७९ हजार ७२२ जणांचा बळी गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात करोनामुक्त होणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. भारतातील करोनामुक्त रुग्णांचं प्रमाण ७७ टक्केंपेक्षा जास्त आहे. देशात आतापर्यंत ३७ लाख ८० हजार १०८ जणांनी करोनावर मात केली आहे.

Exit mobile version