Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

२००४ मध्ये आमच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी कोणी योग्य नेता नव्हता – शरद पवार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | २००४ मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपदासाठी कोणी योग्य नेता नव्हता, छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रिपदा सोपविले असते, तर भविष्यात पक्षात फूट पडली असती. असे विधान शरद पवारांनी केले आहे. योग्य नेता नसल्याने अधिकची मंत्रिपदे आणि खाती मिळवून मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे कायम ठेवण्याचा निर्णयावर आम्ही आलो होतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2004 मध्ये जेव्हा राज्यात सरकार स्थापन केले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला होता, असे अनेक वेळा बोलून दाखवले आहे. तेव्हा मला वेगळे व्हायला पाहिजे होते, असे देखील त्यांनी म्हटले.

पुढे ते म्हणाले, 2004 प्रफुल्ल पटेल भाजपसोबत जाण्यास आग्रही होते. भाजपने इंडिया शायनिंगचा प्रचार सुरु केला, तेव्हा ते भाजपमध्ये जाण्यास आग्रही होते. अटल बिहारी वाजेपेयी यांच्याविषयी आदर असला तरी मते मिळणार, असे मी त्यांना सांगत होतो असे पवारांनी म्हटले आहे. तर शेवटी मी प्रफुल्ल पटेल यांना म्हटले तुम्हाल हव तर तु्ही भाजपबरोबर जा, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडली आहे. दोन्ही पक्षांतील नेतेमंडळी बाहेर गेली आहेत. मात्र, सामान्य कार्यकर्ते मूळ पक्षाबरोबरच आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबाबत तर हे अधिक जाणवते. प्रचारासाठी राज्यभर दौरे केले तेव्हा कार्यकर्ते बरोबर असल्याचे लक्षात आले. नेतेमंडळी गेली असली तरी आम्ही नवीन कार्यकर्त्यांकडे नेतृत्व सोपविले. त्यांचे परिणाम दिसू लागले आहेत

Exit mobile version