Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इम्रानला भारतासोबत युद्धात हरण्याची भीती सतावते

download 7

इस्लामाबाद, वृत्तसंस्था | जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० रद्द करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयानंतर पाकिस्तान सातत्याने युद्धाचा धमक्या देत आहे. मात्र पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान याने स्वत:च हे स्वीकारले आहे की, ते भारताशी युद्ध जिंकू शकत नाहीत. एकीकडे अणुयुद्धाच्या वल्गना करताना इम्रान म्हणाला की, पाकिस्तान भारताशी पारंपरिक युद्ध हरू शकतो, पण याचे परिणाम मात्र गंभीर होतील. असे सांगतानाच त्याने अणुयुद्धाचीही धमकी दिली.

 

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इम्रानला अणुयुद्धाच्या धोक्याबाबत विचारण्यात आले, तेव्हा तो म्हणाला, ‘मी असे म्हटलंय की, पाकिस्तान कधीही अणुयुद्धाची सुरुवात करणार नाही. मी एक शांतताप्रिय व्यक्ती आहे. मी युद्धाच्या विरोधात आहे. युद्धाने समस्या सुटणार नाही, असे मला वाटते. युद्धाचे अनपेक्षित परिणाम दिसतात. व्हिएतनाम, इराक युद्धाचे सध्या गंभीर परिणाम दिसत आहेत.’

इम्रानने पुढे सांगितले की, ‘जेव्हा दोन अण्वस्त्र संपन्न देश पारंपरिक युद्ध करतात, तेव्हा ते युद्ध अण्वस्त्राने संपण्याचीच शक्यता असते. जर पाकिस्तान भारताशी पारंपरिक युद्धात हरत असेल तर देशाकडे दोन पर्याय असतील. एकतर शरण येणे किंवा आपल्या स्वातंत्र्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणे. अशावेळी पाकिस्तान अखेरपर्यंत लढेल आणि जेव्हा कोणी अण्वस्त्र संपन्न देश अखेरपर्यंत लढतो, तेव्हा त्याचे गंभीर परिणाम होतात.’

Exit mobile version