Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आयकर विभागाचे बीएमसीच्या ठेकेदारांवर छापे


मुंबई (वृत्तसंस्था) आयकर विभागाने मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदारांच्या 37 खाजगी ठेकेदारांवर छापे टाकले आहे. 735 कोटी रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार उघड झाला असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे आयकर विभागाने सांगितले आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी महाशिवआघाडीकडून प्रयत्न होत असताना मुंबईत आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. महापालिकेच्या कंत्राटदार कंपन्यांनी मोठय़ा प्रमाणात कर चुकवलाच, पण आर्थिक गैरव्यवहारही केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. आर्थिक गैरव्यवहार 735 कोटी इतका असून हा आकडा आणखी वाढू शकेल, असा दावा आयकर विभागाने केला. आयकर विभागातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरपीएस इन्फ्रा, वनवर्ल्ड टेक्सटाइल ग्रुप आणि स्काय वे-रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंत्राटदार कंपन्यांची कार्यालये, प्रमुखांची निवासस्थाने आदी ठिकाणी छापे घालण्यात आले आहेत. मुंबई महानगरपालिकेने आरपीएस इन्फ्रा आणि रेलकॉन या कंपन्यांना 2017 मध्ये काळ्या यादीत टाकले होते.

Exit mobile version