मुक्ताईनगरात तालुका मराठा समाजाची महत्त्वपुर्ण बैठक

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुका मराठा समाजातर्फे आज जिजाऊ भवन येथे मराठा समाजाच्या प्रमुख व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची महत्त्वपुर्ण बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांचा छोटेखानी अभिनंदनपर सत्कार पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला.

मुक्ताईनगर तालुक्यात मराठा समाजाची लोकसंख्या मोठ्याप्रमाणावर असूनही आजतागायत या समाजाला कायम दुर्लक्षित ठेवण्यात आले होते. परंतु समाजातर्फे आमदार पाटील यांना गेल्या आठवड्यापूर्वी हक्काचे सभागृह मिळावे, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले होते.

यावेळी आमदारांनी लवकरच मागणी पूर्ण करू असे आश्वासन दिले होते. यानंतर अवघ्या आठ दिवसात आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा करून मराठा समाजासाठी हक्काचे “मुक्ताईनगर येथे प्रभाग क्र.१२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह बांधकाम करणे.”(७० लक्ष) अशा भरीव निधीचे विकास काम मंजूर करून आणले त्यामुळे समाजातर्फे या समाज भुषण आमदारांचा सत्कार व्हावा या विषयातून आज गुरुवार दि.१६ जून रोजी जिजाऊ भवन मुक्ताईनगर येथे मराठा समाजाच्या प्रमुख व ज्येष्ठ कार्यकर्त्यांची बैठक पार पडली व या बैठकीत तालुक्यातील प्रत्येक समाज घटकाला आपले हक्काचे सभागृह ठिकाणी जमवून त्यांचं ठिकाणी मंगल कार्यालयाच्या भव्य भूमिपूजनाचा कार्यक्रम व सत्कार मूर्ती आमदार चंद्रकांत पाटील यांचा भव्य सत्कार करण्याचे नियोजन करण्याचे एक मताने ठरविण्यात आले.

यावेळी समाजाच्या बैठकीत आमदार चंद्रकांत पाटील यांना बोलवून त्यांचा छोटेखानी अभिनंदन पर सत्कार पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी आमदार पाटील यांनी यात आणखीन ३० लक्ष चा निधी देणार असल्याची घोषणा केली.त्यामुळे आता या सभागृहाला एकूण १ कोटी निधी ची उपलब्धता झालेली असून न भूतो न भविष्यती असे हे मराठा समाजाची वास्तू येथे उभी राहणार आहे. यामुळे समाजातर्फे आनंद व्यक्त करण्यात आला.

मुंबई येथे मराठा भवन साठी प्रयत्न सुरुय – 

१०  मराठा समाजातील आमदारांच्या पुढाकाराने मुंबई किंवा ठाणे येथे “मराठा भवन” उभारण्यात येणार असल्याची व त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती बैठकीत दिली व यामाध्यमातून मुंबई कडे दवाखाना व मंत्रालयाच्या कामानिमित्त जाणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजातील बांधवांना आपली हक्काची वास्तू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्हा १० आमदारांच्या प्रयत्नातून करीत असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली.

यावेळी मराठा समाजाचे तालुका अध्यक्ष अनंतराव देशमुख , उपाध्यक्ष माणिकराव पाटील , सचिव यू डी पाटील सर सहसचिव इजि संदिप बागुल, सहसचिव भाऊराव पाटील , खजिनदार वसंतराव चोपडे – संस्थेचे संचालक भास्कर पाटील दिनेश कदम, किशोर पाटील मालखेडा, नवनीत पाटील तालखेडा, रघुनाथ पाटील सातोड,नगरसेवक संतोष मराठे,  नरेंद्र गावंडे चिचखेडा, चंद्रकांत कार्ले हरताळे, एस बी पाटील सर, बोरखेडा, साहेबराव पाटील,दिलीप श्रीराम पाटीलसर, पंडितराव पाटील सुकळी, माणिकराव पाटील सुकळी,ललित बाविस्कर,दिनेश सोपान पाटील अतुली, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष किशोर पाटील, रमेश तुळशीराम पाटील,प्रफुल जावरे घोडसगाव, छबिलदास पाटील उचंदा, सचिन पाटील घोडसगाव, प्रफुल्ल पाटील, गणेश घटे निमखेडी,दिलीप माळु पाटील, समाधान दैवलत पाटिल सातोड, महालखेडा येथील भूषण बाबुराव पाटील, गजानन केशव पाटील, नितीन भास्कर पाटील, नारायण पाटील पिपीपचम, वामन बाबुराव पाटील, किरण महाजन आदी उपस्थित

याप्रसंगी मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश पाटील यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मनोगतामध्ये माननीय आमदार चंद्रकांत पाटील अशाच प्रकारे सामाजिक हितासाठी पुढाकार घेऊन समाजातील सर्व घटकांपर्यंत त्यांच्या अडीअडचणी जाणून शासनाच्या विविध योजनांचा त्यांच्यापर्यंत लाभ पोहोचावा व आमदार  साहेबांनी अशीच उत्तरोत्तर प्रगती करून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडावे हिच अपेक्षा व्यक्त केली.

Protected Content