चर्चा, विचारविनिमय करूनच वैद्यकीय आस्थापना कायद्याची अंमलबजावणी- टोपे

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | वैद्यकीय आस्थापनांमध्ये बरीच मते मतांतरे आहेत, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील सर्व घटकांशी चर्चा, विचारविनिमय करून वैद्यकीय आस्थापना कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात वैद्यकीय आस्थापना कायदा लागू करण्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांच्यासमवेत चर्चा झाली आहे. रुग्णांकडून आकारले जाणारे वैद्यकीय उपचार तसेच अनेकविध चाचण्यांचे शुल्क, रुग्णालयाची जागा, मनुष्यबळ, रुग्णाच्या सुचविलेल्या औषधांची विवरण हे सर्व वैद्यकीय आस्थापना कायद्याच्या कक्षेत येणार आहे. यावर वैद्यकीय क्षेत्रात बरेच मतप्रवाह आहेत.

परंतु, कोरोना संसर्ग काळात सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील वैद्यकीय सेवांचे मोठे योगदान आहे. हे लक्षात घेता, कोणत्याही वैद्यकीय शाखा, घटकावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन तसेच खाजगी वैद्यकीय सेवा क्षेत्राच्या अडचणी तसेच त्यांच्याकडे दुर्लक्ष होणार नाही लक्षात घेऊन वैद्यकीय आस्थापना कायदा अंमलबजावणी केली जाईल असे एका कार्यक्रमात बोलतांना आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.

 

 

 

Protected Content