Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संपूर्ण देशासाठी एक भाषा एक संविधान लागू करा – राऊतांचे शहांना आव्हान

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | हिंदी हि पाणीपुरी वाल्यांची भाषा आहे, असे वादग्रस्त वक्तव्य दोन दिवसापूर्वीच तामिळनाडूच्या मंत्र्यांनी हिन्दी भाषेसंदर्भात केले होते. या वक्त्याच्या निर्माण झालेल्या वादावर हिंदी भाषेच्या सन्मानासाठी एक देश, एक संविधान, एक भाषा हे सूत्र लागू करा असे आव्हान खा. संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहांना दिले आहे.

दोन-तीन दिवसापूर्वी तामिळनाडू चे शिक्षणमंत्री पोनुमुडी यांनी हिंदी भाषा पानिपुरीवाल्यांची भाषा असून पाणीपुरीवाले लोक हिंदी बोलतात, यावरून देशाची भाषा हिंदी असून माझ्यासह माझा पक्ष हिंदी भाषेचा सन्मान करतो, देशाने माझे म्हणणे ऐकावे म्हणून मी संसदेत हिंदी बोलतो. त्यामुळे या भाषेचा सन्मान व्हावा, यासाठी एक देश, एक संविधान, एक भाषा हे सूत्र लागू करण्याचे आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वीकारले पाहिजे असे खा. संजय राऊत यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसी मैदानात सभा आहे. विरोधकांवर आजच्या सभेत उपचार केले जातील. बुस्टर डोस कोणाला आणि कुणाचा आहे हे माहित नाही, पण मास्टर ब्लास्टर डोस आजचा फारच फटकेबाज असेल असेही राऊत म्हणाले.

 

 

Exit mobile version