जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘बिलवाडी’ येथे महिलांनी एकत्र येत महिला समिती स्थापन केली असून गावात ‘दारूबंदी योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी’ या आशयाच्या मागणीचे निवेदन या महिला सदस्यांतर्फे सरपंच सदस्यांना देण्यात आले.
येथून जवळच असलेल्या बिलवाडी येथील अनेक कुटुंबांतील सदस्य दारू पिणाऱ्यापासून महिलावर्गास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, याविरुद्ध अनेक महिलांनी एकत्र येत महिला समिती स्थापन केली असून गावात ‘दारूबंदी योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी’ अशा आशयाची मागणीचे निवेदन या महिला सदस्यांतर्फे सरपंच सदस्यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे कि, “जळगाव तालुक्यातील बिलवाडी गावानजीक परिसरातील गावात दारूबंदी आहे. परंतु बिलवाडी गावात मुक्तपणे दारू विक्री केली जात असून बाहेर गावातील नागरिक देखील बिलवाडी येथे दारू घेण्यासाठी येतात. या दारूबाजांकडून गल्ली बोळात व चौकात अनेकवेळा गोंधळ गडबड करीत अश्लील शिवीगाळही केली जाते. यामुळे युवक वर्गदेखील दारूच्या आहारी जात आहे. महिला युवतीना मोकळेपणे गावात फिरणे अशक्य झाले आहे तसेच लहान मुलांवर कुसंस्कार बिंबवले जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात तसेच राज्यात दारूबंदी कायदा आहे. त्यासाठी महिला वर्गाकडून समिती गठीत करण्यात येऊन गावातील महिलांची सभा घेण्यात आली. या बैठकीत महिला वर्गाकडून ‘बिलवाडी गावात एकमुखाने दारूबंदी लागू करण्यात यावी’ अशी मागणी या महिला समितीतर्फे करण्यात येऊन सरपंचाना निवेदन देण्यात आले.