Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सासू-सासर्‍यांच्या घरात राहण्याचा सुनेला अधिकार-सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली । सर्वोच्च न्यायालयाने आज एक अतिशय महत्वाचा निर्णय देत सासू-सासर्‍यांच्या घरात राहण्याचा सुनेला अधिकार असल्याचे नि:संदीग्धपणे नमूद केले आहे.

न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या बेंचने तरुण बत्रा प्रकरणातील दोन न्यायाधीशांचा निर्णय बदलला आहे. तरुण बत्रा प्रकरणात दोन न्यायाधीशांच्या बेंचने सांगितले होते की कायद्यामध्ये महिला तिच्या पतीच्या आई-वडिलांच्या मालकीच्या मालमत्तेमध्ये राहू शकत नाहीत. आता तीन सदस्यीय बेंचने तरुण बत्रा प्रकरणातील निर्णय बदलत ६-७ प्रश्‍नांचे उत्तर दिले आहे. न्यायालयाने सांगितले की, पतीच्या वेग वेगळ्या मालमत्तेतच नाही तर सामायिक घरात मुलीचा देखील हक्क आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, घरगुती हिंसा कायद्यानुसार सुनेला पतीच्या वडील-आईच्या म्हणजेच सासू-सासर्‍यांच्या घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निकाल ऐतिहासीक मानला जात असून याचा अनेक खटल्यांमध्ये निकाल देतांना उपयोग होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Exit mobile version