शरद पवार यांनी घेतली रोग प्रतिकारकता वाढवणारी लस !

पुणे – शरद पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी लस घेतली असून त्यांनी आज स्वतः याबाबत माहिती दिली. 

पुण्यात शरद पवार यांनी शुक्रवारी सिरम इन्स्टिट्यूट ला भेट दिली. त्यावेळी पवार म्हणाले, मी व सिरम इन्स्टिट्यूट चे प्रमुख हे वर्ग मित्र आहे. व त्यामुळेच पवारांनी कोरोनावरची लस घेतली आहे अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून लोकांमध्ये खासगीत सुरु आहे.  हो, सिरम इन्स्टिट्यूटकडून मी व माझ्या सहकाऱ्यांनी लस घेतली. पण ती कोरोनावरची नसून रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी आहे.  कोरोनावरची लस उपलब्ध होण्यासाठी अजून ३ ते चार महिन्यांचा काळ लागण्याची शक्यता आहे. कदाचित जानेवारीच्या शेवटच्या टप्प्यात ही लस मिळेल अशी माहिती सिरमकडून देण्यात असल्याचा उल्लेख यावेळी शरद पवार यांनी केला.   

दरम्यान, हाथरस येथे त्या तरुणीसोबत जो काही प्रकार घडला तो अत्यंत दुर्दैवी असा आहे. पोलिसांकडून तिचा मृतदेह कुटुंबियांकडे न सोपवता परस्पर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. देशातील जनतेने यासारखी घटना आज प्रथमच पाहिली आहे. या सर्व प्रकरणात उत्तर प्रदेश सरकारने कायद्याला कवडीची किंमत दिली नाही हे अधोरेखित होते असे ते म्हणाले.  तसेच कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवली पाहिजे हीच महाविकास आघाडी सरकारची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्यापासून भूमिका आहे.परंतु, आमच्या व्यतिरिक्त कुणाला अजून मराठा आरक्षणासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठवायचे असतील आमची काही हरकत नाही असे ते म्हणाले.

Protected Content