Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांचे तात्काळ लसीकरण करा : प्रविण सपकाळे

 

जळगाव, प्रतिनिधी । गेल्या वर्ष भरात कोरोना संसार्गामुळे जळगाव जिल्ह्यातील आठ ते नऊ पत्रकारांचा बळी गेला आहे.  मात्र,  फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या पत्रकार बांधवांना कोविड लस देण्यात आलेली नाही,  हा आमच्या पत्रकार बांधवांवर अन्याय होतं असून आपण आपल्या स्तरावरून पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबियांसाठी तात्काळ लसीकरण करून देण्याबाबत निर्णय घ्यावा अशा विनंती ईमेलने निवेदन देवून  राज्य पत्रकार संघांचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केली आहे. 

 

आज आज दि.२४ एप्रिल रोजी दिलेल्या निवेदनात प्रवीण सपकाळे यांनी  म्हटलं आहे की, कोरोना महामारी काळात देखील  आमचा पत्रकार हा जीवाची पर्वा न करता फील्डवर वृतांकन करतांना आपण पहिला आहेत. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांना शासन ५० लाखाची मदत करणार होतं त्याबाबत देखील अद्याप कुठलीच कार्यवाही झालेली नाही, कोरोना संकटात वृत्तपत्र व्यवसाय पूर्णतः कोलमडला असतांना तुटपुंज्या पगारावर, मानधनावर व वार्ताहर बांधवाना जाहिरात कमिशनवर काम करावं लागत आहे. अशा बिकट परिस्थितीमध्ये पत्रकार संकटात सापडला असून शासनाकडून देखील दुर्लक्षित होतं आहे. तरी देखील कुठलीही तक्रार न ठेवता पत्रकारितेत सेवा करित आहे.तरी पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबियांच्या लसीकरण करून पत्रकारांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Exit mobile version