Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंजूर असलेल्या जलकुंभाचे कार्य तात्काळ सुरु करा- शिवसेना

पारोळा,  लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पारोळा शहरासाठी वैशिष्ठयपूर्ण योजनेंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या जलकुंभाचे कार्य तात्काळ सुरु करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने आणि माजी नगराध्यक्ष चंद्रकात पाटील याचातर्फे जिल्हाधिकाऱ्याना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे कि, पारोळा शहराची वाढती लोकसंख्या पाहता पिण्याच्या पाण्याची साठवणूक क्षमता आणि सध्या असलेली जलकुंभाची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार पारोळा शहरासाठी वैशिष्ठयपूर्ण योजनेंतर्गत जलकुंभ बांधकामास मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भात पारोळा मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्योती भगत यांना दोन वेळा निवेदन देण्यात आले आहेत. परंतु त्याच्याकडून देखील अद्यापकोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

पारोळा शहरात जलकुंभ बांधकामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे ऑक्टोबर २०२१ मध्ये पत्रव्यवहार करीत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनाच्या नगरविकास विभागातर्फे वैशिष्ठयपूर्ण योजनेंतर्गत नवीन जलकुंभ उभारणीसाठी १ कोटी_रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसा शासन निर्णय क्र.नपावे-२०२१/प्र.क्र.२०१(५) नवि-२६ जळगाव या संदर्भीय पत्राद्वारे नोव्हेंबर २०२१ मधेच आदेश संबंधिताना दिले आहेत. त्यानुसार या नवीन जलकुंभ बांधकामाचे कार्य तात्काळ सुरु करण्याचे निर्देश देण्याची मागणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदन देत केली आहे.

Exit mobile version