Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राज्य समन्वयकांची तात्काळ बदली करा – महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचे आंदोलन

जामनेर प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य तलाठी संघ जामनेर तालुका शाखा यांनी आज तहसील कार्यालयात 11 ते 2 या वेळेत आंदोलन करून तहसीलदार अरुण शेवाळे यांना संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.

निवेदनात ई फेरफार, ई चावडी व ई पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी  रामदास जगताप  यांनी संघटना पदाधिकारी यांचे बद्दल केलेल्या अर्वाच्च्य व असंसदिय विद्याना बद्दल व त्यांचे वागनुकीबाबत त्यांची राज्य समन्वयक पदावरून तात्काळ बदली करण्यात यावी याकरिता महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांनी आंदोलन सुरू केले आहे, त्याचा दुसरा टप्पा म्हणून  आज रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर निदर्शने करणेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याच प्रमाणे आंदोलनाची रूपरेषा म्हणजे

1) दि. 7/10/2021 या दिवशी काळ्या फिती लावून दैनिक कामकाज करणे.

2) दि. 11/10/20२१ रोजी तहसिल कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत निदर्शने करणे,

3) 12/10/2021 रोजी तहसिलदार यांचेकडे डी. एस. सी. जमा करणे.

4)  रामदास जशताप यांची राज्य समन्वयक पदावरून बदली न झाल्यास दि. 13/10/२०११ पासुन नैसर्गिक आपत्ती व निवडणुक कामे वगळता सर्व कागावर परिकार टाकन्यात येईल.

निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष -आर. के. चौधरी, शांतीलाल नाईक, चेतन थाटे, ए. ए. ठाकुर, के. बी.बाविस्कर, एल. बी. कासूदे, ए. एम. गवते, एस.पी. काळे, व्ही. डी. बागडे, एम.पांडागळे, एस. व्ही. पाडळे, आर. जी. मंगे, पी.एस. शिरयान, एम. आर. उंबरकर, डि. ए. महाजन, वाघ पी.एल, वानखेडे एन. के. डी. एम. कोळी यांच्या निवेदनावर साह्या आहेत.

 

Exit mobile version