मी म्हणतोय ना ! तरी पवार यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय योग्य- निलेश राणे

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार मी नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॅबिनेट मंत्र्यांना सांगितले. यावरून भाजपचे निलेश यांनी मी म्हणतोय ना ! असे ट्वीट करीत शरद पवार यांचा राष्ट्रपतीपदासाठीची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी मुंबईत पक्षाची बैठक घेतली. त्यात उपस्थित असलेल्या कॅबिनेट मंत्र्यांना त्यांनी  राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार नसल्याचे स्पष्ट केले होते. या मुद्दयावरुन ‘पवार साहेब, राष्ट्रपती निवडणुकीतून पराभवाच्या भीतीने माघार घेण्याचा निर्णय तुमचा योग्य आहे, कारण तुमच्याकडे मुख्यमंत्री आहेत.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार निवडीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे.  मात्र आता आज दिल्लीमध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवार निवडीसाठी विरोधीपक्षांची बैठक होणार असून त्यापूर्वीच भाजपाचे नेते निलेश राणे यांनी खोचक शब्दांमध्ये शरद पवारांबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ‘मी म्हणतोय ना, तुम्हाला राष्ट्रपती. मग जिंकायची गरज काय? आजपासून तुम्ही राष्ट्रपती’, असा टोला निलेश राणेंनी ट्विटरवरुन लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शहराचे नाव बदलून ‘संभाजीनगर’ करण्यासंदर्भात भाष्य करताना संभाजीनगर नाव होवो की न होवो, मी म्हणतोय ना ‘संभाजीनगर’ असे औरंगाबादमध्ये पार पडलेल्या सभेदरम्यान भाष्य केले होते. याचाच संदर्भ घेत निलेश राणेंनी ट्विटरवरुन आता राष्ट्रपती निवडणुकीचा संदर्भ देत महाविकास आघाडीच्या दोन प्रमुख नेत्यांना लक्ष्य केले आहे.

Protected Content