Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुरांची अवैध वाहतूक करणारे अटकेत

रावेर प्रतिनिधी । महिंद्राची पीकअप व्हॅन आणि आयशर गाडीतून गुरांची अवैध वाहतूक करणार्‍यांना आज पहाटे महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, संदर्भात आंतरराज्जीय सीमेवरील तपासणी नाकाबंदी दरम्यान वाहने चेक करीत असताना यातील एक पांढर्‍या रंगाची महिंद्रा कंपनीची पीक अप एमपी१२ जीए- १९१० या वाहनाची तपासणी करीत असताना यात गुरे कोंबून भरल्याचे आढळून आहे. यामध्ये मुर्‍हा जातीचे काळ्या रंगाच्या ०२ म्हशी व ०१ गावरान म्हैस व ०३ मुर्‍हा जातीचे पाडे(हेले) असे दिसून आले. यानंतर लागलीच याच गाडीच्या मागून आलेल्या आयशर वाहन एमपी ०९ जीएच- १५३७ या वाहनात मुर्‍हा जातीचे काळ्या रंगाच्या १३ म्हशी व ०७ पाडे (हेले) ही गुरे आढळून आली. ही गुरे अपुर्‍या जागेत व अमानुष पध्दतीने कोंबून वाहतूक केली जात असल्याचे चौकशीत आढळून आले. त्यांची कत्तल करण्यात येणार असल्याची माहिती सुध्दा तपासात समोर आली.

या अनुषंगाने रावेर पोलीस स्थानकात भाग ६ गु र न-५९/२०२० कलम-महा. पशुक्रृरता अधि.11(1)(A)(F)(H)(K)(I) सहकलम-मु पो का-119
सहकलम-महा.मोटर वाहन अधि.83/177,सहकलम-पशु वाहतुक अधि.-47,48,49(अ),50 अन्वये १) ओमप्रकाश नवलसिंग गोलकर वय रा. आरुद ता पंधाना जि खंडवा; २) शेख फिरोज शेख मजीद रा खंडवा विमलीपुरा; ३) सादिक शाह हकीम शाह रा झोकर ता मकसिद जि शाजापुर म प्र; ४) रईस सईद कुरेशी रा आष्टा जि सिहोर म प्र; ५) नासीर समी कुरेशी रा आष्टा जि सिहोर म प्र; ६) साहिद रईस मनसुरी रा आष्टा जि सिहोर म प्र & सोहेल मिन्नत कुरेशी रा झोकर ता मकसिद जि शाजापुर म प्र या आरोपींच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. यासोबत महेंद्रा पीकअप व्हॅन व आयशर गाडीलाही जप्त करण्यात आले आहे. डीवायएसपी नरेंद्र पिंगळे व पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास निलेश चौधरी हे करीत आहेत.

Exit mobile version