Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रावेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक ; तिघांवर कारवाई

WhatsApp Image 2019 09 25 at 7.30.18 PM

रावेर, प्रतिनिधी | अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर-ट्रॉलीवर महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. तिघांवर सुमारे चार लाख रूपयां पर्यंत दंड होणार असल्याचे माहिती महसूल विभागाच्या सुत्रानी दिली आहे. ही कारवाई दुपारच्या सुमारास करण्यात आली.

या बाबतवृत्त असे की, महसूल विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काही ट्रॅक्टर-ट्रॉली अवैध वाळूची वाहतूक करत होते. यावेळी तात्काळ महसूलच्या पथकाने कारवाई करत वाहतूक करणा-या ट्रॅक्टर-ट्रॉलीला रंगे हात कपडले आहे. यामध्ये रावेर येथील विकास रतीराम घेटे यांच्या मालकिच्या (ट्रॅक्टर-ट्रॉली क्रमांक एम एच १९ एएन १५०१) ला के-हाळा वरुन रसलपुर जात असतांना पकडले. तर धनराज भिमराव बघाडे यांच्या मालकीच्या (ट्रॅक्टर-ट्रॉली क्रमांक १९ एएम १५९०) ला देखिल याच रस्तावर पकडले. तसेच अटवाळे येथील नितिन आत्माराम धनगर यांच्या मालकीच्या (ट्रॅक्टर-ट्रॉली क्रमांक एमएच १९ बिजी ३०८०) ला भोकरी वरुन के-हाळा जात असतांना पकडण्यात आले. या तिघांवर सुमारे चार लाखापर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. ही कारवाई नायब तहसीलदार सजंय तायडे, मंडळ अधिकारी संदीप जैस्वाल, तलाठी दादाराव कांबळे, यासीन तडवी, शैलेश झोटे यांच्या पथकाने केली.

महसूलच्या धास्तीने मध्यरात्री होते वाहतूक

सध्या तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीची धड-पकड सुरु असून वाळू माफियांनी महसूलची कमालीची धास्ती घेतली आहे. आता वाळूची अवैध वाहतूक करण्याची वेळ बदलून मध्यरात्री करण्यात आली आहे. के-हाळा-रसलपुर व्हाया शिवाजी चौक रावेर मार्गाचा जास्त वापर होत असून निंभोरासिम भागात देखिल असीच धडक कारवाई करण्याची मागणी जनतेतुन होत आहे.

Exit mobile version