Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अवैध दारू विकणार्‍यावर कारवाई

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील पापा नगरात अवैधी दारू विक्री करणार्‍याला बाजारपेठ पोलीसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील पापा नगरात शेख सलीम शेख हमीद (वय ५५) हा अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरिक्षक भागवत यांना मिळाली होती. यावरून बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने त्याला अटक करून त्याच्याकडील ऐवज जप्त केला आहे. यात टँगो पंच कंपनीच्या दहा बाटल्यांचा समावेश आहे. त्याच्यावर मुंबई प्रोव्हीजन अ‍ॅक्ट ६५ (इ) प्रमाणे कार्यवाही करण्यात आलेली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, पोलीस निरिक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल संजय भदाणे, रवींद्र बिर्‍हाडे, रमण सुरळकर, विकास सातदिवे, श्रीकृष्णा देशमुख, उमाकांत पाटील, ईश्‍वर भालेराव आणि प्रशांत पाटील यांच्या पथकाने केली आहे.

Exit mobile version