अवैध दारू विक्री करणार्‍यांवर पोलिसांची कारवाई

चाळीसगाव प्रतिनिधी । मेहुणबारे पोलिस स्थानकाच्या पथकाने करमुड गावात छापा टाकत सहा हजार सहाशे ऐंशी रुपयांचा अवैध मद्य साठा जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तालुक्यातील करमुड गावातील भिलाटी भागात सर्रास बेकायदेशीर मद्यविक्री होत असल्याची माहिती सूत्रांनी पीएसआय हेमंत शिंदे यांना दिली.

या अनुषंगाने पीएसआय हेमंत शिंदे यांनी सोबत योगेश बोडके व प्रताप मथुरे यांना सोबत घेऊन दि.७ एप्रिल रोजी रात्री छापा टाकला. त्यात देशी व विदेशीच्या दारूच्या बाटल्या एकूण ६,६८० रूपयांचा मध्यसाठा मिळून आला. फिर्याद पोकाँ/१०८९ योगेश बोडके यांनी दिली आहे.

ही कारवाई पीएसआय हेमंत शिंदे, पोलिस नाईक/९७१ प्रताप मथुरे व पोकाँ/१०८९ योगेश बोडके आदींनी केली. पोलिस निरीक्षक यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलिस नाईक/९७१ प्रताप मथुरे हे करीत आहेत.

Protected Content