गोळीबार टेकळी शिवारातील शेतात जिवंत वृक्षांची बेकायदेशीर कत्तल

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील शहरालगत असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतबांधावर आणि शेजारच्या शेतातील अनेक जिवंत वृक्षांची एकाने बेकाद्याशीर तोड केल्याची लिखित तक्रार येथील तहसीलदार आणि वन विभागाचे वनक्षेत्रपाल यांच्याकडे केली असून ‘असे कृत्य करणाऱ्यांवर प्रशासनाच्या वतीने तात्काळ कार्यवाही व्हावी.’ अशी मागणी केली आहे.

या संदर्भात यावल शहरातील बडगुजर गल्लीत राहणारे दिनेश श्रावण बोरसे या शेतकऱ्यांने यावलचे तहसीलदार महेश पवार व वन विभागाकडे लिखित तक्रारीद्वारे मागणी केली आहे. यात, “यावल शहरालगत असलेल्या गोळीबार टेकळी शिवारात माझे शेत असून माझ्या शेजारी दयाराम नामदेव फेगडे राहणार महाजन गल्ली यावल यांचे शेत आहे. वन विभागाकडून कुठलीही पूर्व परवानगी न घेता त्यांच्या शेतातील १० ते १२ वृक्षांची जिवंत वृक्षांची तोड केली जात आहे.

असे असतांना वृक्षांची तोड कणाऱ्यांनी माझ्या शेतातील बांधावर असलेले १० वर्ष वयाच्या जिवंत निंबाचे वृक्ष आमची किंवा वन विभागाची किंवा कुणाचीही प्रशासकीय परवानगी न घेता तोडलेले आहेत.

एकीकडे राज्य शासना पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवडीकरीता युद्धपातळीवर ‘झाडे लावा; झाडे जगवा’ या कार्यक्रमा अंतर्गत विविध वृक्षांच्या लागवडीसाठी कोटयावधी रुपये खर्च करीत असतांना दुसरीकडे मात्र अशाप्रकारे वृक्षांची बेकाद्याशीर तोड करण्यात येत असून, यासंदर्भात माझ्या तक्रारीची दखल घेत प्रशासनाने त्वरीत कार्यवाही करीत वृक्षतोड केलेली सर्व जिवंत झाडे तात्काळ जप्त करावी आणि पंचनामा करीत बेकाद्याशीर वृक्षतोड करणाऱ्या मंडळीवर गुन्हा दाखल करावा.” अशी मागणी एका निवेदनाव्दारे शेतकरी दिनेश श्रावण बोरसे यांनी केली आहे.

Protected Content