Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लोहारा येथे अवैध दारूभट्टी उद्ध्वस्त; एकावर गुन्हा दाखल

सावदा ता. रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील लोहारा येथे अवैध गावठी दारूची भट्टी सावदा पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्याने मिळाली त्यानुसार आज कारवाई करत दारूभट्टी उद्ध्वस्त केली आहे.

सावदा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील लोहारा गावात  संशयित आरोपी मुशिर नजीर तडवी हा गावापासून जवळच असलेल्या अंतरावर बेकायदेशीररित्या गावठी दारू बनवत असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास इगोले यांना मिळाली. त्यानुसार सावदा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस हवालदार मेहरबान तडवी, रिजवान पिंजारी, जयराम खोडपे यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक ठेंगडे, नितीन पाटील, सागर देशमुख यांनी कारवाई करत १० हजार रुपये किमतीची १ हजार लिटर गावठी दारू नष्ट केली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी मशीनची तडवी यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Exit mobile version