Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूरात अवैध धंद्यावर कारवाईचा पोलीसांकडून निव्वळ देखावा?

police

फैजपूर(प्रतिनिधी) पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंदे बंद आहेत. दुसरीकडे मात्र, फैजपूर परिसरात अवैध धंदे अवघ्या एका दिवसाचा बंद पाळत पुन्हा सुरु झाले आहेत. त्यामुळे फैजपूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी केलेली कारवाई फक्त देखावा होती का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वैजापूर गावात दोन दिवसापासून अवैध धंदे बंद होते. या अवैध धंद्यासंदर्भात दि ६ सप्टेंबर रोजी वृत्त प्रकाशित होताच. त्याच दिवशी अवैध धंद्यावर फैजपूर पोलिसांनी कारवाई केली होती. परंतु ही कारवाई म्हणजे निव्वळ देखावाच असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे. पोलिसांनी फैजपूर व कासवा येथे सट्टा खेळतांना दोन जणांवर कारवाई केली होती. शहरातील गजानन वाडी भागात नितीन लीलाधर हेगडे हा सट्टा घेताना आढळून आला होता. त्याच्याकडून ३१५ रुपये रोख व जुगाराची साहित्य तसेच कासवा येथील सुनील दामू सपकाळे यांच्याकडून ५२० रुपये रोख जुगाराची साधने जप्त करण्यात आली आहे. तसेच पाडळसा येथे वीस लिटरची हातभट्टीची दारू विक्री करीत असताना रूपा रामू तायडे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई फैजपुर पोलीस स्टेशनचे सपोनि प्रकाश वानखडे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. या कारवाईत पीएसआय जिजाबराव पाटील, सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, पोलीस कॉन्स्टेबल किरण चाटे ,अनिल महाजन, विनोद पाटील व उमेश पाटील या पथकाने ही कारवाई केली.

 

सट्टा पिढीवर का होत नाही कारवाई?

 

तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा अवैध धंदे सुरु होताच कसे? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार हे अवैध धंदे सुरू केले ता जात नाही ना? अशी चर्चा आहे. तसेच काल शुक्रवारी कारवाई होताच. आज फैजपूर शहरातील व न्हावी येथील अवैध धंदे पोलिसांच्या आदेशाने बंद करण्यात आलेले आहे. तर हे अवैध धंदे सुरू करण्यासाठी पोलीस सूचना देतात का? वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली स्थानिक पोलीस स्टेशन मार्फत दाखवली जातेय का? स्थानिक पोलिसांना गावातील सट्टापेढी कोणत्या ठिकाणी आहे, हे माहीत असतांना त्या सट्टा पेढीवर कारवाई का केली जात नाही? असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करिती आहेत.

Exit mobile version