Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

समाजसेवकातून जातीय सलोखा पाळावा – अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव (व्हिडीओ)

iftar party pachora

पाचोरा (गणेश शिंदे)। पाचोरा वर्षाच्या बारा महिन्यातील रमजानचा महिना मुस्लिम बांधवासाठी विशेष महत्वाचा समजला जातो. हा महिना संयम व समर्पण राखत अल्लाहची ईबादतचा महिना मानला जातो. देशात सर्वधर्म समभावची परंपरा कायम राखत प्रत्येक समाजात सलोखा पाळावा असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी केले. पाचोरा पोलीस प्रशासच्या वतीने मुस्लिम बांधवाच्या पवित्र रमजान निमित्त ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

रमजान सण उत्सव हे आनंदाचा ठेवा असतात. या महिन्यात अल्लाहशी नाते जुळविण्यासह पुण्य कर्माचे लाभ मिळविण्यासाठी रोजे ठेवण्यात येते. सण उत्सव व धार्मिक कार्यातून काही काळ मनाची शांती, मनाची स्थिरता निश्चित लाभते. म्हणून यातून मिळणारी उर्जा, मिळणारा उत्साह द्विगुणीत व्हावा व बंधुभाव कायम राहावे हा त्यामागचा खरा उद्देश होता. म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन पाचोरा पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलिस निरीक्षक पंकज शिंदे दत्तायंत्र नरवाडे याच्या सहकार्याने गोपनीय विभागातील प्रकाश सूर्यवंशी सुनील पाटील यांनी केला होता. हा आज सायंकाळी ६ वाजता स्टेट बँक जवळ व्ही पी रोड येथे आयोजन करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बचाव हे होते तर अध्यक्ष म्हणून पाचोरा भडगाव विधानसभेचे लोकप्रतिनिधी आमदार किशोर पाटील हे होते. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ, नगराध्यक्ष संजय गोहिल, तहसीलदार कैलास तावळे, आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळूखे, सुधन हॉस्पिटलचे डॉ. प्रशांत पाटील, सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ.स्वप्नील पाटील, जवाहर इलेक्ट्रॉनिक राकेश पुसनांनी, डॉ गोरख महाजन, गजानन ग्रुपचे राजाराम सोनार, उपनगराध्यक्ष शरद पाटे व पोलीस प्रशासनतर्फे उपपोलिस निरीक्षक पंकज शिंदे, गणेश चोबे,दत्तायंत्र नरवाडे, ॲड. अमजद पठाण, झाकीर खाटीक, रफीख बागवान, उपपोलिस निरीक्षक गणेश चोबे, गोपनीय विभागातील नितीन सुरवंशी, राहुल सोनवणे, राहुल बेहरे, गजानन काळे, सुनील पाटील, प्रकाश सुरवंशी, प्रकाश पाटील, किरण पाटील, राजू तोडकर, नितीन राठी, अमजद खान, सईद पंजाबी, फईम शेख, साहेबराव पाटील, माजी सभापती प्रल्हाद पाटील, अस्लम शेख, एजाज शेठ, इमरान खान यांच्यासह सर्व पक्षाचे नगरसेवक राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी मुस्लिम समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी आभार मानले आयोजित पार्टीत बहुसंख्येने मुस्लिम व हिंदू बांधव उपस्थित होते.

Exit mobile version