Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कामाच्या मोबादल्यात पैसे मागितल्यास तक्रार द्या – बीडीओ दिपाली कोतवाल

रावेर प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीत ग्राम पंचायत सदस्यांकडून कामाच्या मोबदल्यात पैसे मागत असेल तर पुरावे देवून तक्रारी करावी असे आवाहन गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी केले आहे.

याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील ऐनपूर ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल जैतकर यांनी पंचायत समितीच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये कामाच्या मोबदल्यात पैसे मागितल्याची लेखी तक्रार आमदार चंद्रकांत पाटलांकडे केली होती. यामुळे हे प्रकरण बाहेर आले होते. यासंदर्भात  पंचायत समितीत कोणी कामाच्या मोबदल्यात पैसे मागत असेल तर पुरावे आणि तक्रार दिल्यानंतर  त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी दिली आहे.

Exit mobile version