ओबीसींविषयी कळवला आपुलकी असेल तर हमखास यश मिळते- मुख्यमंत्री चौहान

बीड / मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | माझ्यासोबत कोण आहे किंवा नाही हे न पहाता ओबीसी आरक्षणासाठी कोर्टात गेलो, चार महिने अविरत मेहनत घेत प्रशासनाकडून अद्ययावत माहिती घेतली. ओबीसींविषयी कळवला आपुलकी असेल तर हमखास यश मिळते अशी टीका शिवराजसिंह चौहान यांनी गोपीनाथगडावर कार्यक्रम प्रसंगी केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करत असताना ओबीसी आरक्षण रद्द झाले असल्याचे जाहीर झाले. त्याचवेळी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत हे जाहीर केले होते. त्यानुसार कोर्टात गेल्यानंतर मागासवर्गीय आयोगाचा सर्वेक्षण अहवाल जमा करण्याचे आदेश कोर्टाने दिले. त्यानुसार मागासवर्गीय आयोग अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत किती टक्के आरक्षण देता येईल याची तयारी केली. सुप्रीम कोर्टासाठी वकिलांची नेमणूक केली. सविस्तर माहिती ब्रीफिंग देखील दिले आणि चार महिने अविरत डाटा संकलन कामासाठी प्रशासनाकडून माहिती जमा केली. तीच माहिती कोर्टात सादर केली आणि ३५ टक्के आरक्षण मंजुरी न्यायालयाने दिली. त्यानंतर ओबीसी आरक्षणसह निवडणुका जाहीर केल्या, अशी माहिती देत ओबीसी विषयी जाणीव असेल तर मार्ग हमखास निघतो असा टोला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गोपीनाथ गडावर झालेल्या कार्यक्रमात लावला आहे.

Protected Content