आदिवासींना खावटी धान्य दिले नाही तर विकास मंत्र्यांना घेराव – राजपा

यावल प्रतिनिधी । महाराष्ट्रातील आदिवासींना तातडीने खावटी धान्य दिले नाही तर राजसपा पक्षाचे आदिवासी विकास मंत्री त्यांना घेराव घालतील, असे राष्ट्रीय आम सेवा पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस अजित एन. तडवी यांनी आदिवासी विकास मंत्री यांना निवेदन पाठविले आहे.

कोरोना विषाणूमुळे आदिवासी समाज बेरोजगारीतुन उपासमारीच्या मार्गावर आला असून अशा परिस्थितीत आदिवासी समाजाला मदत करणे ही राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे. आदिवासी समाजाला दरवर्षी आर्थिक कर्ज दिले जाते. परंतू राज्य शासनाकडुन या अंतर्गत दिले जाणारे खावटी कर्ज धान्य या योजनेअंतर्गत २०१४ पासून आदिवासी समाजाला शासनाने कोणताही लाभ दिलेला नसल्याचे दिसुन येत असुन, यामुळे राष्ट्रीय आम सेवा पार्टीने राज्यशासनाकडे महाराष्ट्रातील आदिवासी समाजाला खावटी धान्य देण्याची विनंती केली असुन असे असतांना देखील आतापर्यंत महाराष्ट्राच्या आदिवासी समाजाला खावटी कर्ज धान्य दिले जात नाही. या संदर्भात राष्ट्रीय आम सेवा पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस  अजित एन. तडवी यांनी आज ६ मार्च रोजी आदिवासी विकास मंत्री यांना निवेदन पाठविले आहे. 

या पत्रकात म्हटले आहे की, जागतिक साथीच्या कोविड -१ ९या कोरोना विषाणूमुळे बेरोजगारीतुन आर्थिक संकटात आलेल्या महाराष्ट्राच्या आदिवासी समाजाला तातडीने आदिवासी समाजाला किमान आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी अत्य आवश्यक असलेला मुबलक धान्य तात्काळ वाटप करण्यात यावे अशी मागणी करून राजपा पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अजित एन. तडवी म्हणाले आहेत की, खावटी धान्य महाराष्ट्रातील आदिवासी समाजाला त्वरित न दिल्यास राजप पक्षाच्या वतीने राज्याचे आदीवासी विकास मंत्री यांना घेराव घालण्यात येईल असे राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांना दिनांक ६ मार्च २०२१ रोजी पाठविण्यात आलेल्या पत्रकात नमुद करण्यात आले आहे . या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रीय आम जनता पार्टी पार्टी केन्द्रीय कार्यालय, दिल्ली यांना विनंतीसह पत्र पाठविण्यात आले असल्याची माहीती राजसपाच्या वतीने राष्ट्रीय सचिव अजीत तडवी यांनी कळविले आहे. 

 

Protected Content