Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कोरोना : आजही कोरोना नरमला; दिवसभरात ९३४ बाधित आढळले तर ११७४ रूग्ण झाले बरे !

 

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ९३४ बाधित रूग्ण आढळले आहे. तर १ हजार १७४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज जळगाव शहरासह रावेर तालुक्यात बाधितांची संख्या अधिक आहे. तर दिवसभरात २० रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील आकडेवारी

जळगाव शहर-२२०, जळगाव ग्रामीण-४३, भुसावळ-४२, अमळनेर-२४, चोपडा-७३, पाचोरा-८, भडगाव-१२, धरणगाव-५८, यावल-३१, एरंडोल-८४, जामनेर-८५, रावेर-१०६, पारोळा-२६, चाळीसगाव-६३, मुक्ताईनगर-४०, बोदवड-८ आणि इतर जिल्हे ११ असे एकुण ९३४ बाधित रूग्ण आढळले आहे.

प्रशासनाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात एकुण १ लाख ६ हजार ७० बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ९२ हजार ८७३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ११ हजार ३२९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात एकुण २० बाधितांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे. 

Exit mobile version