Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आयसीयू जागतिक युवा पार्लमेंट संमेलनासाठी खा. रक्षा खडसे यांची निवड

मुक्ताईनगर, लाईव्ह ट्रेंड्स न्युज, प्रतिनिधी | इजिप्त मधील शर्म–अल-शेख येथे ८ व्या दोन दिवसीय ‘आयसीयू जागतिक युवा पार्लमेंट संमेलन’, होणार आहे. या परिषदेसाठी ३ सदस्यीय भारतीय शिष्टमंडळात जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघाच्या खा. रक्षा खडसे यांचा समावेश आहे.

इजिप्त मधील शर्म–अल-शेख येथे दोन दिवशीय ८ व्या ‘आयसीयू जागतिक युवा पार्लमेंट संमेलन’ होणार असून लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदार संघाच्या खा. रक्षा खडसे यांचे नामनिर्देशन केले आहे. शर्म–अल-शेख हे शिनाई द्वीपकल्पातील वाळवंट आणि तांबडा समुद्र यांच्यामधील किनारपट्टीवर वसलेले असुन हे शहर अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा आणि राजनेतिक बैठकांसाठी प्रसिद्ध असे महत्त्वपूर्ण केंद्र आहे.

जागतिक पर्यावरण हवामान बदल (Climate Change)” संदर्भात जागतिक स्तरावरील युवकांचे काय विचार आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत किंवा ते कसे आटोक्यात आणण्यासाठीच्या उपाययोजना, या महत्त्वपूर्ण विषयांवर विचार विनिमय व चर्चा करण्यासाठी ‘ इंटर-पार्लमेंटरी युनियन (IPU) व इजिप्त्शियन पार्लामेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १५ व १६ जून असे दोन दिवसीय संमेलन घेण्यात येणार असून खा. रक्षा खडसे या ३ सदस्यीय भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत.

त्री सदस्यीय भारतीय शिष्टमंडळ १४ जून रोजी दिल्ली येथून रवाना होणार असून १८ जून ला मायदेशी परतणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निवड केलेल्या त्री सदस्यिय मंडळ प्रमुख उत्तर प्रदेशचे बुलंदशहर येथील खा. भोला सिंह, नागालँड येथून राज्यसभा खा. फान्गनॉन कोन्याक् आणि जळगाव जिल्ह्यातील खा. रक्षा खडसे यांचा समावेश आहे. भारत हा युएनएफसीसीसीच्या क्योटो प्रोटॉकल व पॅरिस करार साठी एक महत्त्वपूर्ण पक्ष / हिस्सा आहे व ह्या करारामध्ये केलेल्या ८ उद्दिष्ट  २०२१-२०३० या कालावधीसाठी निर्धारित आहे त्यातील अत्यंत महत्त्वाचे असे तीन-चार उद्दिष्टांसाठी  नेमकी जागतिक तरुणांची काय भूमिका आहे व त्यासाठी त्या त्या देशांनी टार्गेट पूर्ण करण्यासाठी काय पावले उचलली आहेत व त्या त्या देशातील निर्धारित उदिष्टची सद्यस्थिती काय आहे हे मांडण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात
खा. रक्षा खडसे या आयपीयु इंटर-पार्लमेंटरियन फोरम (IPU Inter-Parliamentarian Forum) च्या एशिया पॅसेफिक ग्रुप वर गेल्या ४ वर्षापासून बोर्ड मेंबर असून त्यांनी या माध्यमातून होणार्‍या अनेक संमेलन व चर्चासत्रात भारताचे प्रतिनिधित्व करीत देशाची भूमिका जागतिक मंचावर मांडली आहे. गेल्या मार्च महिन्यात त्यांनी इंडोनेशियातील नुसा-दुआ, बाली येथे झालेल्या १४४ व्या ५ दिवसीय बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व केले आहे.

Exit mobile version