Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आयसीएसई, आयएससी दहावी व बारावीचा निकाल जाहीर

icse isc result 2019

नवी दिल्ली वृत्तसंस्था । आयसीएसई बोर्डाचा इयत्ता १० वीचा, तसेच आयएसई १२वीचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यंदा आसीएसई दहावीचा ९८.५४ इतका निकाल लागला आहे. तर आयएई १२ वीचा ९६.५२ टक्के इतका लागला आहे. आयसीएईत मुंबईची जुही कजारिया इयत्ता दहावीच्या परीक्षेत देशात पहिली आली आहे. जुहीला ९९. ६० टक्के गुण मिळाले आहेत. तर मुंबईची अनुश्री चौधरी, यश भन्साळी, अनुष्का अग्निहोत्री यांनी देशात दुसरे स्थान पटकावले आहे. जुही कजारिया ही मुंबईतील जमनाबाई बजाज शाळेची विद्यार्थिनी आहे.

आयसीएसई, आयएसई परीक्षांचा निकाल सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. यंदा आयसीएसई १० वीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान झाली. तर, आयसीएसई १२ वीची परीक्षा ४ फेब्रुवारी ते २५ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. गेल्या वर्षी १४ मे २०१८ या दिवशी आयसीएसईचा निकाल जाहीर झाला होता. ह्यात ICSE 10 वी च्या परीक्षेत ९८.५३ टक्के, तर 12 वी च्या परीक्षेत ९६.४७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.

> प्रथम www.cisce.org संकेतस्थळाला भेट द्या.
> त्या नंतर समोर आलेल्या लिंकवर क्लिक करा
> त्यानंतर विचारलेला आयडी क्रमांक आणि इतर माहिती भरा
> त्या नंतर Submit बटन दाबा, या नंतर तुमचा निकाल दिसेल. संदर्भासाठी निकालाची प्रिंट आऊट काढा

Exit mobile version