Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मी राजकारण सोडणार नाही, मी शेती करणार नाही ; उद्धव ठाकरेंचा अजितदादांना टोला

download 9 1

मुंबई (प्रतिनिधी) मी राजकारण सोडणार नाही, मी शेती करणार नाही, असा टोला शिवसेना उद्धव तःक्रे यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेल्या अजित पवार यांना उद्देशून लगावला. ते मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

 

मुंबईतील रंगशारदात शिवसेनेचे २८८ मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आणि जिल्हाप्रमुखांची शनिवारी बैठक झाली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची भूमिका मांडली. ठाकरे म्हणाले, शिवसेनेची स्थापना कोणताही मुहूर्त किंवा काळ बघून झालेली नाही. एकीकडे देश चंद्राकडे झेप घेतोय. मंगळावर पाणी शोधतोय आणि आपण अजून पत्रिकेत मंगळ शोधत बसलो आहे. आयुष्य बदलण्याची जर कोणत्या खड्यामध्ये ताकद असेल, तर जिवंत माणसांमध्ये की ताकद का नसेल,” असे यावेळी ठाकरे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या जे काही सुरू आहे, त्याचा उद्धव ठाकरे यांनी आज कार्यकर्ता मेळाव्यात शेलक्या शब्दांत समाचार घेतला. ‘कर्माने मरणार त्याला धर्माने मारू नका. जे जसे वागले त्यांच्यावर तशी स्थिती आली,’ अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली. त्याचवेळी पवारांच्या कौटुंबिक कलहात मला रस नाही, असेही सांगितले.

Exit mobile version